कोकणातील देवगड तालुक्यात खुडी या गावात दर रविवारी शाळेच्या प्रांगणातच असा हा आठवडी बाजार भरतो माल कुठला तर घरचा विक्रेते कोण तर शाळकरी मुले. हे खरे व्यावसायिक प्रशिक्षण आजच्या काळाची गरज !!
खर तर ही कल्पना ज्या शिक्षकाना सुचली आणी ती प्रत्यक्ष अंमलात आणली त्या सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा वाह.. पाठ्यपुस्तकी शिक्षणा सोबत व्यावसाईक शिक्षण खर तर ही संकल्पना कोकणातील सर्व शाळात रुजायला हवी मग बघा आजच्या पिढीला जे जमल नाही ते उद्याच्या पिढी करुन दाखवेल " कोकणचा सार्वांगिक विकास " काय विकल गेले किती विकले गेले हे महत्वाचे नाही तर मी विकले आणि पैसे कमवले हा आनंद आणी आत्मविश्वास नक्किच मिळेल त्या शिवाय मार्केट आणी आपल्या मालाचे मार्केटिंग कस करायचे याचे शिक्षण या बालवयातच मिळेल. M.B.A. म्हणजे यशस्वी व्यावसाईक बनण्याचे प्रशिक्षण तेच कोकणातील या शाळेत बालवयात मिळेल आणि कोकणात पुठच्या पिढीचे सर्व विध्यार्थी M.B.A असतील