वेवूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.निलेश भोईर व सौ.संघमित्रा निलेश भोईर यांनी जिल्हा परिषद शाळा वेवूर येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती वसुमती चित्रे मॅडम होत्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष (पर्यावरण विभाग) श्री.अमोल चूरी व नगरसेवक श्री.तुषार भानुशाली होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बोईसर एज्युकेशन चे डॉ. स.दा.वर्तक चे सह कार्यवाह श्री. डॅरल डिमेलो सर यांनी डॉ.स.डा.वर्तक (दादा) यांच्या स्मरणार्थ ३६० मच्छरदाणी चे वाटप केले या कार्यक्रमात सौ प्रज्ञा ठाकूर, वासंती झोप, सौ.अर्चना म्हात्रे (भानुशाली), सौ मनिषा भानुशाली, सौ.मोनिका गवळी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कांचन पाटील, स्काऊट मास्टर अजित दळवी, श्री.नरेंद्र घरत आणि सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. गावामध्ये होणाऱ्या मच्छरांच्या त्रासाला पर्याय म्हणून मच्छरदाणी वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे आयोजक निलेश भोईर यांनी मांडले तर संघमित्रा भोईर यांनी ८ मार्च महिला दीन का साजरा करतात यावर मार्गदर्शन केले, श्री.डिमेलो सरांनी मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ओळखायला शिकले पाहिजे तसेच मुलांना अपशब्द न वापरण्याबद्दल सांगितले, अध्यक्षा चित्रे मॅडम यांनी स्त्रियांना मान कसा द्यावा आणि त्यांनी खऱ्या अर्थाने महिलांनी कसं वागावं त्यांचे हक्क आणि कर्तव्य याबद्दल मोलाची माहिती दिली तर सौ.प्रज्ञा ठाकूर,सौ.मोनिका गवळी, श्री.तुषार भानुशाली आणि अमोल चुरि यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.
महिलांना गुलाबाचे फुल आणि मच्छरदाणी वाटप करून महिलांचा सन्मान केला गावातील महिलांनी या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजक श्री.निलेश भोईर आणि श्री. अजित दळवी सरांनी सूत्रसंचालन केले तर सौ.प्रज्ञा ठाकूर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला स्काऊट आणि गाईड च्या विद्यार्थ्यांनी योगदान दिले तर सौ. अश्विनी राऊत मॅडमनी कोरोना व्हायरस बद्दल माहिती सांगितली.
र