रोग प्रतिकारक क्षमता वाढवूया, कोरोनावर मात करूया!...


नैसर्गिक संसाधनावर अवलंबून असणाऱ्या आदिवासी बांधवांची शारीरिक रोगप्रतिकारकशक्ती दृढ असण्याचे कारण त्यांचा पौष्टिक आहार आहे…


कोरोना विषाणूच्या भीतीचे सावट असताना नेमकं आपली रोगप्रतिकारक क्षमता आपण कशी वाढवू शकतो याचा शोध तुम्ही सुरू केला असेल. याच एक उत्तर म्हणजे आपण घेत असलेला आहार. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा, याची माहिती तुम्हा वाचकांसाठी


आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरीत्या शेती केली जाते. ही पिके शरीराला आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा करते. लसूण, कांदा, हळद आहारात समाविष्ठ असल्यास कोणत्याही रोगाच्या संसर्गाचे प्रमाण कमी करता येते. रानभाज्या, ऋतुमानानुसार मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या शरीराला घातक विकारांपासून बचावासाठी मदत करतात.
पालक- शरीरात चपळता आणि ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त. पालक सेवनाने पचनक्रिया सुरळीत होते. खोकल्यावर गुणकारी


शेवगा- शेवग्यामध्ये झिंक, जीवनसत्व अ, क, इ, लोह असते. यात अँटी ऑक्सिडंट भरपूर असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


लसूण- आदिवासी भागात मिळणारा लसूण ही असाच विशेष गुणधर्म असलेला आहे. पदार्थाची चव वाढवण्यासोबतच लसणात अ, ब, क जीवनसत्त्वांसह लोह, आयोडीन, कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे पोषक तत्त्व एकत्रित मिळतात. लसणाचे रोजचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.


हळद- अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. याचा प्राचीन काळापासून औषध म्हणून वापर केला जातो. हळदीत कर्क्युमिन हे एक मजबूत रोगप्रतिकारक बूस्टर आहे.


मध- मध पौष्टिक आणि औषधी गुणधर्माने लुप्त असतात. मधामध्ये एंजाइम आणि अँटीऑक्सिडंट प्रमाण चांगले असते. सोबतच ब-जीवनसत्व, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, आयर्न, फॉस्परस, नियासिन, मॅग्नेशियम आणि शियमीन यांसारखी पोषकतत्वे मुबलक प्रमाणात असतात. लसूण आणि मध यांचे मिश्रण शरीराला घातक अशा जीवाणू व विषाणूंना दूर ठेवण्यास सहायक ठरते.


ओवा- ओव्याचा रस हा हायड्रेटिंग आहे. ओव्यात जीवनसत्व सी, ए, ई तसेच सोडियम व फोलिक ऍसिड चांगल्या प्रमाणात असते. शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे व शरीरात प्रवेश करणाऱ्या जंतूंना मारण्याचे काम ओवा करते.


जिरे- जिऱ्यामध्ये मॅग्नेशियम व लोहाचे प्रमाण जास्त असते. गर्भवती महिला, स्तनदा माता, आजारी व्यक्ती व लहान मुलांना शारीरिक कमजोरीला दूर करण्यास सहाय्यक


भोपळा- आदिवासी भागात भोपळ्याला खूप महत्व आहे. भोपळा औषधी भाजी असून त्यात जीवनसत्त्व ‘क’, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत.


लिंबू- लिंबामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस, क्लोरीन इत्यादी घटकांबरोबर प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सी असते. लिंबू रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.


जनहितार्थ जारी
समर्पण चँरिटेबल ट्रस्ट